निवृत्तीची वयोमर्यादा न वाढवल्यास मुंबईतील १ सहस्र २०० डॉक्टरांची संपाची चेतावणी

१ मेपासून संपावर जाणार

कोरोनाचे सद्यःस्थितीतील गंभीर संकट पहाता डॉक्टरांनी संपावर जाणे, म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार होय ! आपत्काळात स्वतःच्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसणे कितपत योग्य ?

मुंबई – निवृत्तीची वयोमर्यादा वाढवावी, या मागणीसाठी वैद्यकीय शिक्षक संघटनेकडून १ मेपासून संपावर जाण्याची चेतावणी देण्यात आली आहे. या संघटनेचे १ सहस्र २०० सदस्य आहेत. ६२ वर्षे असलेली निवृत्तीची वयोमर्यादा वाढवावी, अशी या डॉक्टरांची मागणी आहे.

याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना संघटनेचे सदस्य म्हणाले, ‘‘यापूर्वी वर्ष २००९ मध्ये या डॉक्टरांचे निवृत्ती वय ५८ वरून ६२ वर्षे करण्यात आले. कोरोनाच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोरोनाच्या नावाखाली काही डॉक्टरांच्या निवृत्तीवयाची मर्यादा वाढवली आहे. हा नियम सर्व डॉक्टरांसाठी लागू करावा अन्यथा ‘काम बंद’ आंदोलन करू.’’