मागील १४ मासांत तुम्ही काय केले ?

मद्रास उच्च न्यायालयाने कोरोनावरून केंद्र सरकारला फटकारले

चेन्नई (तमिळनाडू) – कोरोनाची लाट टोक गाठत असतांना त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही मागील १४ मासांमध्ये काय केले ? अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना फटकारले. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील राजकीय सभांवर चाप लावण्यात अपयशी ठरल्यावरून निवडणूक आयोगाला उत्तरदायी ठरवले होते.

मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले की, देशातील कोरोना महामारीला रोखण्यासाठी कोणा एकामध्ये सामर्थ्य असू शकत नाही. केंद्र सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यावरून योजनाबद्धरित्या आणि प्रभावी पद्धतीने काम केले पाहिजे.