यवतमाळ येथे बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसंदर्भातील तक्रारींच्या निवारणार्थ नियंत्रण कक्ष कार्यान्वित !
बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, बियाणे आस्थापनांचे प्रतिनिधी, कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी आणि तक्रारी यांचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.