कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली हिंदु कुटुंबाकडून ८० सहस्र रुपये उकळणार्‍या पाद्य्राच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा बातम्या तथाकथित ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे दडपतात आणि अंनिसवाले भोंदू ख्रिस्ती पाद्य्रांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

जालंधर (पंजाब) – येथे कर्करोगावर उपचार करण्याच्या नावाखाली पाद्री बलविंदर याने मुंबईत रहाणार्‍या एका हिंदु कुटुंबाची ८० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तसेच या पाद्य्राने या कुटुंबाचे धर्मांतर करण्याचाही प्रयत्न केला होता. या पाद्य्राच्या एका समर्थकाने या कुटुंबाला सांगितले होते की, पाद्री बलविंदर याच्याकडे प्रत्येक रोग बरे करण्याची शक्ती आहे. त्यामुळेच हे कुटुंब जालंधर येथे गेले होते.

बलविंदर याने या कुटुंबाकडे प्रथम १ लाख रुपयांची मागणी केली होती; मात्र त्यांनी ८० सहस्र रुपये देण्याची सिद्धता दर्शवली. उपचाराच्या नावाखाली या पाद्य्राने तेल आणि पाणी दिले; मात्र त्याचा वापर करूनही या कुटुंबातील तरुणीचा जीव वाचू शकला नाही. त्यामुळेच या कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली.