दोडामार्ग – तालुक्यातून गोवा राज्यात कामानिमित्त ये-जा करणार्यांचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत दळणवळण बंदीच्या काळात गोव्यात ये-जा करणार्यांना मुभा होती; मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता गोव्यात ये-जा करण्यासाठी केवळ २ दिवस मुभा मिळणार आहे. तशा सूचना १९ एप्रिलला सायंकाळपासून पोलीस तपासणी नाक्यांवर देण्यात आल्या आहेत. २ दिवसांनंतर जर कामानिमित्त गोव्यात ये-जा करायची असल्यास आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. एकदा चाचणी केल्यावर पुढील १० दिवस प्रवासासाठी मुभा मिळणार आहे. ही चाचणी करण्याची सुविधा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात असून ती विनामूल्य आहे, अशी माहिती दोडामार्ग तहसीलदार खानोलकर यांनी दिली.