देहलीमध्ये मास्कविषयी विचारणा केल्याने दांपत्याकडून पोलिसांना शिवीगाळ

अशांना अटक करून कोरोनाचा संसर्ग नष्ट होईपर्यंत त्यांना कारागृहात डांबण्याची शिक्षा केली पाहिजे !

नवी देहली – मास्क न लावता चारचाकी गाडीतून प्रवास करणार्‍या दांपत्याला पोलिसांनी रोखल्यावर या दांपत्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दांपत्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल केला. या वेळी हे दांपत्य पोलिसांना ‘भिकारी’ म्हणत असल्याचे या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. पंकज दत्ता आणि आभा दत्ता असे या दांपत्याचे नाव आहे. दरियागंज येथे ही घटना घडली. सध्या देहलीत केवळ अत्यावश्यक सेवा आणि ई-पास असणार्‍यांना बाहेर फिरण्याची अनुमती आहे.