अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्याच्या विरोधात गुन्हा नोंद
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या गुन्हेगाराला कठोर शासनच करायला हवे !
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या गुन्हेगाराला कठोर शासनच करायला हवे !
होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी २६ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे यांना निवेदन देण्यात आले.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना वर्ष २०२० चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. २५ मार्च या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली.
माथाडी कामगार संघटनेचे (संस्थापक) स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची ३९ वी पुण्यतिथी २३ मार्च या दिवशी नवी मुंबईतील माथाडी भवन येथे साजरी करण्यात आली. यानिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांनी प्रास्ताविकामध्ये महावितरणने सामान्य व्यापारी आणि सामान्य वीजग्राहक यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पिळवणूक थांबवावी. दळणवळण बंदीच्या काळात व्यापार मंदावला आणि परिणामी अर्थव्यवस्था कोलमडली.
ब्रिटनच्या बॅटले ग्रामर स्कूलमध्ये शार्ली हेब्दो या मासिकात प्रसिद्ध झालेले महंमद पैगंबर यांचे चित्र असलेला अंक शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्याने मुसलमानांनी निदर्शने केली. यामुळे मुख्याध्यापकांनी क्षमा मागत शिक्षकाला निलंबित केले.
अमेरिकेपेक्षा भारतातच कित्येक संधी आहेत. अमेरिकेचा अभिमान बाळगण्यापेक्षा भारताचा स्वाभिमान असणारे नक्कीच सर्वार्थाने उजवे आहेत.
भारतात रहाणारे चिनी शिकवण्याचे काम अल्प करतात आणि भारतीय तरुणांचा बुद्धीभेद करून मानसिक युद्ध करण्याचा प्रयत्न अधिक करतात. अशा गोष्टींचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होत असतो. आशा आहे की, येणार्या काळात भारत सरकार हेही थांबवण्याचा प्रयत्न करेल.
होळीच्या दिवशी लक्ष्मणाला प्रभु श्रीरामांची चरणसेवा मिळाली होती. त्याविषयी प्रचलित असलेली लोककथा येथे देत आहोत.
‘फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रतिवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ (होळी) या नावाने यज्ञ होऊ लागले.