अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या गुन्हेगाराला कठोर शासनच करायला हवे !
नागपूर, २६ मार्च ( वार्ता.) – येथील एम्आयडीसी पोलीस क्षेत्रातील गुन्हेगारी वृत्तीच्या राजदेव शाहू (वय १९ वर्षे) याने शेजारी रहाणार्या कुटुंबातील १० वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तिच्या लहान भावाला त्याने खाऊ आणण्यासाठी बाहेर पाठवले. मोठी मुलगी शिवणकामाच्या वर्गाहून परतल्यावर तिच्या हे लक्षात आले. आई-वडील कामावरून परतल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगाराला कह्यात घेतले आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. याविषयीची पुढील न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे.