तीनहून अधिक रुग्ण आढळल्यास ५० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार !

महापालिका, पोलीस, उत्पादन शुल्क यांसह विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १९ मार्चपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

बँक डेटा चोरी प्रकरणी एकाच खात्यात १०० कोटी रुपये असल्याची माहिती उघड

देशभरातील वेगवेगळ्या अधिकोषातील काही खात्यांची गोपनीय माहिती मिळवणे आणि त्यांची विक्री करून त्याद्वारे कोट्यावधी रुपये कमवणे असा कट नुकताच पुणे सायबर पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पाचगणी (जिल्हा सातारा) प्राधिकरण कार्यालयात अभियंता आणि शाखाधिकारी यांच्यात हाणामारी

गत ४ दिवसांपासून पाचगणी शहरातील एका भागात पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांनी प्राधिकरण कार्यालय गाठले; मात्र समस्येवर उपाय न काढता वरिष्ठ अभियंता आणि शाखाधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर पुढे हाणामारीमध्ये झाले.

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे भासवून खोडसाळपणा ! – जयसिंगपूर पोलीस

जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे भासवून कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. कोल्हापूर बॉम्बशोधक पथकाने याविषयी सखोल पहाणी केल्यावर यात ठेवलेल्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचे छोटे पाईप गुंडाळून ठेवलेले आढळले. यात कोणतीही स्फोटके मिळालेली नाहीत.

कोपरा किनगाव (जिल्हा लातूर) येथील सरपंचासह १६ जणांविरोधात गुन्हा नोंद

अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे पीडित मुलीच्या घरासमोरील जागेत असलेले देवीचे मंदिर आणि मूर्ती पाडण्यास विरोध करणार्‍या पीडित मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांसह १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशा धर्मांधांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

मध्यप्रदेशातील मुरवास गावामध्ये धर्मांध वन माफियांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवणारे संतराम वाल्मीकि यांची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली. धर्मांध वन माफिया भ्रष्ट वनाधिकार्‍यांच्या साहाय्याने येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करत होते.

शासकीय संकेतस्थळावर श्री महालक्ष्मी देवीसह कोल्हापूर जिल्ह्यातील चुकीचे ऐतिहासिक संदर्भ : भाविकांमध्ये संतापाची लाट

जिल्हा प्रशासनाच्या वतीने kolhapur.gov.in या नावाने अधिकृत संकेतस्थळ चालवण्यात येते. या संकेतस्थळावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची चुकीची माहिती देण्यात आली आहे.

कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या दिवशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष मार्गिका

आपत्कालीन वाहनांना ये-जा करण्यासाठी डेहरादून ते हरिद्वारपर्यंत विशेष मार्गिका (ग्रीन कॉरिडोर) उपलब्ध करून देण्यात येणार आहे

कुंभमेळ्यासाठी १२० कोटी रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्या हस्ते लोकार्पण

कोरोनामुळे कुंभमेळा कसा होणार ? याविषयी गैरसमज पसरवण्यात आले.