
जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – जयसिंगपूर येथील एका रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याचे भासवून कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. कोल्हापूर बॉम्बशोधक पथकाने याविषयी सखोल पहाणी केल्यावर यात ठेवलेल्या वस्तूंमध्ये प्लास्टिकचे छोटे पाईप गुंडाळून ठेवलेले आढळले. यात कोणतीही स्फोटके मिळालेली नाहीत. खोडसाळपणे ज्याने ही बॉम्बसदृश संशयित वस्तू ठेवून लोकांमध्ये गैरसमज आणि भीती पसरविण्याचा प्रयत्न केला, त्या संबंधित व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री