शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकार्‍यांची नेमणूक नियमबाह्य ! – औरंगाबाद खंडपिठाचा आदेश

साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती नियमबाह्य असून राज्य सरकारने त्याविषयीचे शपथपत्र सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १५.२.२०२१ 

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

श्री गणेश जयंती निमित्त ‘साधनेतून समृद्धीकडे’ व्याख्यानाचे आयोजन !

‘अक्षर ऊर्जा मर्म योग‘ या संस्थेच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त ‘साधनेतून समृद्धीकडे’ या विषयावरील याख्यान १५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘झूम’ प्रणालीवर आयोजित करण्यात आले आहे.

परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांचा केलेला साठा जप्त !

काळभोरनगर भागात ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून २३ लाख ६० सहस्र ३०० रुपये किमतींचे रसायनसदृश ज्वलनशील द्रवपदार्थ जप्त केले.

पुण्यातील मेट्रो सेवा कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने दिले ३६७ कोटी रुपये !

पिंपरी आणि पुणे येथील प्राधान्य मार्गावर मेट्रोच्या अपुर्‍या कामांसाठी निधी अल्प पडू नये; म्हणून ३६७ कोटी रुपये निधी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) प्रकल्पासाठी राज्य सरकारने दिला आहे. या प्रकल्पात राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा आहे.

१५ फेब्रुवारी हा ‘फास्ट टॅग’ सुविधेच्या मुदतवाढीचा अखेरचा दिनांक

वाहनधारकांनी तात्काळ ‘फास्ट टॅग’ सुविधा घ्यावी, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेे.

काँग्रेसींचे धर्मांधप्रेम जाणा !

मी श्रीराममंदिरासाठी पैसे दिल्याचे वृत्त रा.स्व. संघाने पसरवले आहे. या वृत्तामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची क्षमा मागतो, असे विधान केरळमधील काँग्रेसचे आमदार एल्धोस कुन्नाप्ली यांनी केले.

धनबाद (झारखंड) येथे प्रशासन आणि महाविद्यालये यांना निवेदन अन् ‘ऑनलाईन’ बैठकीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे प्रबोधन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाने होणारे अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील महाविद्यालये चालू करण्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार

मुंबईतील कोरोनाचा संसर्ग पहाता २२ फेब्रुवारीपर्यंत याविषयी आढावा घेऊन मगच मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये चालू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबई विद्यापिठाला पाठवले आहे.

स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याची पद्धती अन् त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

‘बहुतांश हिंदु स्त्रिया आणि काही पुरुष कपाळाला कुंकू किंवा गंध लावतात. त्यांची पद्धती प्रांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे निरनिराळी आहे. स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.