परवाना न घेता ज्वलनशील पदार्थांचा केलेला साठा जप्त !

पिंपरी-चिंचवड – येथील काळभोरनगर भागात ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून २३ लाख ६० सहस्र ३०० रुपये किमतींचे रसायनसदृश ज्वलनशील द्रवपदार्थ जप्त केले. ज्वलनशील पदार्थांची साठवणूक करण्यासाठी अग्नीशमन दल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा परवाना आवश्यक असतांना असा कोणताही परवाना न घेता साठवणूक केली आहे. या प्रकरणी चौघांना कह्यात घेतले असून गुन्हा नोंद केला आहे.