कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील महाविद्यालये चालू करण्याविषयीचा निर्णय घेण्यात येणार

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल

मुंबई – राज्यातील विद्यापिठे आणि त्यांच्या अंतर्गत येणारी महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग पहाता २२ फेब्रुवारीपर्यंत याविषयी आढावा घेऊन मगच मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये चालू करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पत्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबई विद्यापिठाला पाठवले आहे.

विद्यार्थ्यांना लोकल रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासाची अनुमती देण्याविषयीचा निर्णयही कोरोनाचा आढावा घेऊनच घेण्यात येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.