१५ फेब्रुवारी हा ‘फास्ट टॅग’ सुविधेच्या मुदतवाढीचा अखेरचा दिनांक


नागपूर – १५ फेब्रुवारीनंतर महामार्गावरील अखंड वाहतुकीसाठी ‘फास्ट टॅग’ प्रणालीला आता मुदतवाढ दिली जाणार नाही.

सर्व पथकर नाक्यावर आणि अन्य ठिकाणी ‘फास्ट टॅग’ आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तात्काळ ‘फास्ट टॅग’ सुविधा घ्यावी, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेे. फास्ट टॅगसाठी यापूर्वी २-३ वेळा मुदतवाढ दिली आहे.

गडकरी या वेळी म्हणाले की, डिझेलच्या तुलनेत एक किलो सी.एन्.जी. ५१-५२ रुपयात येतो. यावर ४ किलोमीटर ट्रॅक्टर चालतो. साधारणत: शेतातील वापरावरील ट्रॅक्टरची एक ते दीड लाख रुपये व मालवाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवरील खर्चात तीन लाख रुपयांची बचत होईल. पूर्व विदर्भातील सर्व सहाही जिल्ह्यातील ५ वर्षांच्या आत सर्व वाहने सी.एन्.जी.वर करण्यात येतील. महापालिकेची वाहने सीएनजीवर चालण्यासाठी संबंधितांना सूचना केली आहे. हळूहळू सर्व कार्यालयामागे सी.एन्.जी. भरण्याची सोय करण्यात येईल.