महिलेवर दुष्कर्म करणार्‍या पोलिसासह दोघांवर गुन्हा नोंद

वासनांध पोलीस ! पीडितेला साहाय्य न करता तिच्यावर अत्याचार करणारे पोलीस महिलांचे शीलरक्षण कसे करू शकतील ? अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !

माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन

शिवसेनेचे नेते, तसेच माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि युवासेना कोअर टीमचे सदस्य सिद्धेश कदम यांच्यासह २३ फेब्रुवारी या दिवशी श्री तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर कदम कुटुंबियांचा मंदिर संस्थानच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.

मुंबईत पोलीस खात्यात ५० टक्के उपस्थिती : ‘वर्क फ्रॉम होम’ चालू

मुंबई शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस खात्यातील कार्यालयात गट-अ आणि गट-ब संवर्गातील अधिकार्‍यांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात येणार आहे; मात्र गट-क आणि ड संवर्गातील कर्मचार्‍यांंची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के राहील,असे आदेश देण्यात आलेले आहेत.

५ संशयितांविरुद्ध अडीच सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट; ६१ कोटींहून अधिक अपहाराचा ठपका

भाईचंद हिराचंद रायसोनी बी.एच्.आर्. अपव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात ५ संशयितांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले.

(म्हणे) ‘पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी पाठवलेला प्रस्ताव अयशस्वी ठरला !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्यासाठी इम्रान प्रयत्न करत आहेत .

प्रगती कि अधोगती ?

आज वाढत चाललेल्या आत्महत्या ही जगासाठी डोकेदुखी किंबहुना धोक्याची घंटा असल्याचे सिद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ‘जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. वर्षाकाठी अनुमाने ८ लाख लोक आत्महत्या करतात.

अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर स्फोटके भरलेली गाडी सापडली !

आवश्यकता पडल्यास अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू ! – शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री

ग्रामीण भागात ३ सहस्र २०० चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामाला नगररचनाकारांच्या अनुमतीची आवश्यकता नाही ! – हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

ग्रामीण भागात १ सहस्र ६०० चौरस फूट पर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी मालकी कागदपत्रे, मोजणी नकाशा, इमारतीचा आराखडा आणि हे सर्व आराखडे युनिफाईड ‘डी.सी.आर्.’ नुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे केवळ ग्रामपंचायतीला सादर करावी लागणार आहेत.

पोहरादेवी (वाशिम) येथे महंतांसह १९ जणांना कोरोनाची लागण

पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या गर्दीचे प्रकरण