माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन

श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला उपस्थित कदम कुटुंब

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – शिवसेनेचे नेते, तसेच माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि युवासेना कोअर टीमचे सदस्य सिद्धेश कदम यांच्यासह २३ फेब्रुवारी या दिवशी श्री तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर कदम कुटुंबियांचा मंदिर संस्थानच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.

या वेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. शामल पवार, तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम, उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, युवा सेना जिल्हा सरचिटणीस लखन परमेश्‍वर, तुळजापूर युवा सेना तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी, युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे, तसेच दिलीप जावळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.