मुंबईत पोलीस खात्यात ५० टक्के उपस्थिती : ‘वर्क फ्रॉम होम’ चालू

मुंबई – मुंबई शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस खात्यातील कार्यालयात गट-अ आणि गट-ब संवर्गातील अधिकार्‍यांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात येणार आहे; मात्र गट-क आणि ड संवर्गातील कर्मचार्‍यांंची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के राहील, असे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्य कर्मचार्‍यांनी ५० टक्के उपस्थितीत काम करण्याचे आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार ५० टक्के उपस्थितीसह ‘वर्क फ्रॉम होम’ चालू करण्यात आले आहे.