अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील सक्षम लोकांना शिक्षण आणि नोकरी यांतील आरक्षण रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अनुसूचित जातीच्या युवकाकडूनच याचिका !

नीमच (मध्यप्रदेश) – येथील विक्रम बागडे या अनुसूचित जातीच्या युवकाने अनुसूचित जाती आणि जमाती यांतील सक्षम लोकांना शिक्षण आणि नोकरी यांत आरक्षण देण्यात येऊ नये, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात टपालद्वारे केली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आहे.

या याचिकेत या वर्गातील लोकांनी स्वछेने आरक्षण सोडावे, असा पर्याय देण्याचाही आग्रह केला आहे. या याचिकेवर पुढील मासात सुनावणी होऊ शकते. विक्रम बागडे एल्.एल्.बी.च्या प्रथम वर्गाचे विद्यार्थी आहेत. ते स्वतः या याचिकेवर युक्तीवाद करणार आहेत. बागडे यांनी सांगितले की, माझा राजकारणातील आरक्षणाला विरोध नाही. मी माध्यमिक शिक्षणानंतर आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही.