हिंदूंच्या देवतेचे अवमानकारक चित्र पोस्ट केल्याच्या प्रकरणी पाकच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची क्षमायाचना !

पाकमधील हिंदूंच्या विरोधाचा परिणाम !

पाकमध्ये धर्मांधांच्या दहशतीखाली वावरत असूनही तेथील हिंदू सत्ताधारी पक्षाच्या खासदाराला क्षमायाचना करण्यास भाग पाडतात, हे कौतुकास्पद आहे. भारतातील जन्महिंदू यातून बोध घेतील तो सुदिन !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या तेहरिक-ए-इन्साफ या सत्ताधारी पक्षाचे खासदार आमीर लियाकत हुसैन यांना हिंदूंच्या देवतेचा अवमान करणारे ट्वीट केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी लागली आहे. त्यांनी हे ट्वीटही डिलीट केले आहे. ‘हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याची मला कल्पना आहे. सर्व धर्मांवर माझा विश्‍वास आहे, हेच मला माझ्या धर्माने शिकवले आहे’, असे हुसैन यांनी म्हटले.

(असे असते, तर असे चित्र पोस्ट केले गेलेच नसते !  हिंदूंनी विरोध केल्यामुळे हुसैन आता क्षमा मागत आहेत ! – संपादक) विरोधी पक्षाच्या नेत्या मरीयन नवाज यांची खिल्ली उडवण्यासाठी हुसैन यांनी हिंदूंच्या देवतेचे चित्र पोस्ट केले होते. त्यानंतर त्याचा हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्यानंतर त्यांनी क्षमायाचना केली. पाकिस्तान हिंदु परिषदेचे प्रमुख रमेशकुमार वाकंवानी म्हणाले की, धार्मिक विचारवंत म्हणवणार्‍या व्यक्तीने अशा प्रकारचे ट्वीट करणे शोभत नाही. त्यांच्या लज्जास्पद कृत्याचा आम्ही निषेध करतो.