लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न करू ! – पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांचा मानस

पिंपरी-चिंचवड शहराला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार-नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील

पुणे येथील पोलीस हवालदारानेच तरुणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस

जनतेचे रक्षण करणारेच जनतेचे भक्षक झाल्यास जनता कुणावर विश्‍वास ठेवणार ?

नागपूर येथे विविध विवाह समारंभात लोकांची गर्दी; महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाकडून ८ मंगल कार्यालयांवर कारवाई !

विवाह समारंभात वर्‍हाडाच्या झालेल्या गर्दीमुळे महापालिकेच्या ‘उपद्रवी शोध पथका’ने ८ मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला.

कोलकात्यामध्ये भाजपच्या नेत्यांवर दगडफेक : एक नेता गंभीररित्या घायाळ

फूलबागान भागामध्ये भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी, शंकुदेब पंडा आणि शिबाजी सिंह यांच्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करत आक्रमण केले. यात शिबाजी सिंह गंभीररित्या घायाळ झाले.

कृषी कायदे मागे घेतल्यास संविधान धोक्यात येण्याची भीती ! – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री, भारिप

दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने नवे कृषी कायदे मागे घेतले, तर अन्यही कायदे मागे घेण्याची मागणी होऊ शकते.

एल्.ई.डी. बल्ब प्रकल्प निधी वाढवून द्या ! – शिवसेनेचे निवेदन

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात येणार्‍या प्रस्तावित एल्.ई.डी. बल्ब प्रकल्पात पालट करून २५ कोटी रुपयांचा निधी वाढवून द्या, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले.

शहरात फिरणार्‍या चारचाकीना फास्टॅगची सक्ती तसेच दंडात्मक कारवाई करू नका ! – सजग नागरी संघटनांची मागणी

शहरात फास्टॅग सक्ती कशासाठी ?, याविषयी सरकार स्पष्टीकरण देत नाही.

मराठ्यांनी ३० वर्षे देहलीवर राज्य केल्यामुळेच देशाची सीमा सतलजपर्यंत पोहोचली ! – यशोधरा राजे शिंदे

सध्याच्या काळात आपल्यातील वैर विसरून आणि पूर्वीच्या चुका टाळून आपणही एकत्र आले पाहिजे.

मराठा आरक्षणप्रश्‍नी उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

आरक्षणाविषयीच्या कोणत्याही खटल्यात वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये.