
सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये अनुमाने अर्धा घंटा चर्चा झाली. या वेळी मराठा आरक्षणासह विविध विषयावर चर्चा झाली.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना विनंती केली होती की, आपण वडीलकीच्या नात्याने मराठा आरक्षणप्रश्नी लक्ष घालावे. आरक्षणाविषयीच्या कोणत्याही खटल्यात वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये. सरकारला तशा सूचना देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. तसेच विविध सूत्रांवर श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश सरकारला द्यावेत. मराठा आरक्षणाविषयी सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास उद्रेक होईल, अशी चेतावणीही खासदार भोसले यांनी दिली होती. आता खासदार भोसले यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)