१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यास इतरांवर जरब बसेल.
सोलापूर – उत्तर-सोलापूर तालुक्यातील नांदूर येथील अवैध वाळू उपसा करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. यामध्ये १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १७ संशयित आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपी हे यारी मशिनच्या साहाय्याने शासनाची अनुमती न घेता, तसेच कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता चोरून वाळू उपसा करत होते.