लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न करू ! – पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांचा मानस

नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील

पिंपरी – शहरातील नागरिकांच्या अपेक्षा तसेच शहरातील समस्या काय आहेत हे पाहून घेऊ. लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी प्रयत्न करू. पारदर्शक कारभार करीत कोणत्याही गैरकारभाराला थारा देणार नाही, असे प्रतिपादन करीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार राजेश पाटील यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी स्विकारला त्या प्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पिंपरी-चिंचवड शहराला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

पदभार स्विकारला म्हणून मी काही जादू करणार नाही. त्यासाठी सर्वांचे सहकार्य हवे. शहरातील नागरिक, राजकीय यंत्रणा तसेच प्रशासकीय कर्मचार्‍यांचे सुद्धा सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संवेदनशीलतेने विचार करून काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस राजेश पाटील यांनी व्यक्त केला.