कोलकात्यामध्ये भाजपच्या नेत्यांवर दगडफेक : एक नेता गंभीररित्या घायाळ

कोलकाता (बंगाल) – येथील फूलबागान भागामध्ये भाजपचे नेते शुवेंदू अधिकारी, शंकुदेब पंडा आणि शिबाजी सिंह यांच्यावर अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक करत आक्रमण केले. यात शिबाजी सिंह गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.