भारताने भुतान आणि मालदीव यांना भेट स्वरूपात कोरोनावरील लसींचे अडीच लाख डोस पाठवले !

भारत नेहमीच शेजारी देशांना साहाय्य करत आला आहे; मात्र पाक आणि नेपाळ यांसारखे शेजारी देश भारताला पाण्यात पहात असतात. त्यांच्यासमवेत गांधीगिरी करण्याऐवजी त्यांना धडा शिकवण्याचाही प्रयत्न भारताने केला पाहिजे !

मुंबई येथे नशायुक्त पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी करणार्‍या धर्मांध महिलेला अटक, अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

समाजाला नशेच्या आहारी घालणार्‍या धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नसल्याचे दिसते !

न्यायालयीन प्रकरणांचे वार्तांकन करून त्यात हस्तक्षेप केल्यास पत्रकारांवर न्यायालय अवमान कायद्याखाली कारवाई होणार

पोलीस तपास चालू असलेल्या प्रकरणाचे वार्तांकन करून त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालय अवमान कायद्याखाली कारवाई होऊ शकते, असा महत्त्वाचा निर्णयही सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायलयाने दिला आहे.

कोटी कोटी प्रणाम !

• वळपे, पेडणे येथील श्री राष्ट्रोळी ब्राह्मण खडपेश्‍वर रुद्रेश्‍वर देवस्थानचा आज जत्रोत्सव !
• गुरु गोविंदसिंह जयंती (परंपरागत)

काँग्रेसच्या काळात म्हणजे १९८० च्या दशकापासून चीनचे भारतीय भूमीवर नियंत्रण !

काँग्रेसच्या काळात झालेल्या चुका भाजपच्या राज्यात सुधारणे आवश्यक आहेत, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

‘तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे का ?’- अभिनेत्री कंगना राणावत यांचा आव्हानात्मक प्रश्‍न

‘‘क्षमा मागण्यासाठी तो राहील तरी कसा ? ते थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जिवे मारले जात नाही, तर ते करणे किती योग्य होते, हेही सिद्ध केले जाते. बोल अली अब्बास जफर तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे ?’

केवळ क्षमा नाही, तर सर्वांना कारागृहात टाकणार ! – आमदार राम कदम, भाजप

‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अ‍ॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये.

आमच्याही वर एखादे न्यायालय असते, तर ५० टक्के आदेश पालटले गेले असते ! – सर्वोच्च न्यायालय

‘जनतेच्या मनातील शंका दूर होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निकाल देतांना असे जे म्हटले आहे, त्यावर न्यायव्यवस्थेने विचार करून ही त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत’, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करणार !

नेताजी बोस यांची जयंती केवळ ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी न करता प्रत्यक्षात पराक्रम करून दाखवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरील !

(म्हणे) ‘कर्नाटकातील इंचभरही भूमी देणार नाही !’

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेली ६० वर्षे चालू असून तो सामोपचाराने सोडवण्याची आवश्यकता असतांना अशा प्रकारचे विधान करणे संतापजनक आहे, हे येडियुरप्पा यांनी लक्षात घ्यायला हवे !