मुंबई येथे नशायुक्त पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी करणार्‍या धर्मांध महिलेला अटक, अंमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

धर्मांध महिलाही अमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात !

मुंबईच्या अँटी नारकोटिक्स सेलमधील अधिकारी आणि मध्यभागी अटक करण्यात आलेली महिला

मुंबई – मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने वांद्रे परिसरातील लिंकरोड भागात कारवाई करत नजमा अहमद शेख या नशायुक्त पदार्थांची (ड्रग्ज) तस्करी करणार्‍या महिलेला अटक केली आहे. (समाजाला नशेच्या आहारी घालणार्‍या धर्मांधांना आता कायद्याचे भय वाटत नसल्याचे दिसते !  – संपादक) तिच्याकडून त्या ठिकाणी १०० ग्रॅम एम्.डी. पावडर आणि २० सहस्र रुपये रोख रक्कम, तसेच तिच्या कुर्ला येथील घरी धाड मारून २ किलो ७०० ग्रॅम चरस आणि ९ लाख ४५ सहस्र रुपये असे ७६ लाख ६५ सहस्र रुपयांचे नाशायुक्त पदार्थ आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही महिला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणत नाशायुक्त पदार्थांची विक्री आणि पुरवठा कोणाला करीत होती. तिने इतक्या मोठ्या प्रमाणत हा साठा कुठून आणला याचे अन्वेषण अमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.