अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर पोलिसांची धाड

देहली दंगलीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप

धर्मांध अधिवक्ता झाले, तरी गुन्हेगारी कृत्य करतात, असेच यातून लक्षात येते !

अधिवक्ता महमूद प्रचा

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने प्रसिद्ध अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर धाड टाकली. देहली दंगलीतील एका आरोपीला जामीन मिळण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

तसेच त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे या आरोपीला खोटी जबानी देण्यास बाध्य केले. तसेच अन्य एका अधिवक्त्याच्या हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जो ३ वर्षांपूर्वीच मृत पावला होता.