मुंबई – कांदिवलीतील चारकोप येथील साईबाबा मंदिरात २७ डिसेंबरला पहाटे ३ वाजता ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर घायाळ झाला आहे. सुभाष खोडे आणि युवराज पवार अशी मृतांची नावे आहेत.
हे तिघे जणही मंदिरात झोपले होते. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना लगेच बाहेर पडता आले नाही. आगीची माहिती मिळताच पहाटे सवाचार वाजता अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी पोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. घायाळ युवकाचे नाव मनू गुप्ता असून त्याच्यावर उपचार चालू आहेत.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !