ठाणे येथील मंदिराची दानपेटी फोडणार्‍या दोघांना अटक

येथील मानपाडा भागात असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम चोरणार्‍या अजय जयस्वार (वय २२ वर्षे) आणि सलमान खान (वय २० वर्षे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली.

अन्वेषणात कुचराई करणार्‍या अमली पदार्थविरोधी पथकाच्या २ अधिकार्‍यांचे निलंबन

अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

पंढरपूरकरांना आजपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री विठ्ठल दर्शन

पंढरपूरकरांना ५ डिसेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आगाऊ’ नोंदणी न करता थेट घेता येणार आहे. पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना रहिवासी असल्याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

समाजातील विवाह समारंभ आणि सनातन आश्रमातील विवाह सोहळा पाहून साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

आश्रमातील विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसलेली आणि साज-शृंगार केलेली वधू शोभून दिसत होती. ती ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्याचे मला दिसले. नवरदेवाचे रितीनुसार धोतर आणि उपरणे सुशोभित वाटले. या सर्वांमध्ये कुठेच कृत्रिमता नव्हती. तेथे सर्वांमध्ये देवाप्रतीचा उत्कट भाव, भक्ती, नम्रता, लीनता आणि देवाला अपेक्षित असे वागणे दिसून येत होते.

खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांसह अन्य आरोपींना १९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश

 खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांसह अन्य आरोपींना १९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश

वरवरा राव यांच्या जामिनाच्या याचिकेवर १४ डिसेंबर या दिवशी सुनावणी

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेले लेखक वरवरा राव यांनी आरोग्याच्या कारणास्तव जामिनाच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर १४ डिसेंबरला या दिवशी सविस्तर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ठाणे येथील उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणारे तिघेजण अटकेत

वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार काही जणांकडून चालू आहेत. अशाच एका उद्योजकाला खुनाची धमकी देत त्याच्याकडून ६ लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डॉक्टरांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाला कर्नाटक राज्यातून १६८ डॉक्टर ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. यातील अनेकांनी आम्ही नियमितपणे यापुढे अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित राहू असे कळवले होते.

पुनर्अन्वेषणाचा आदेश वैयक्तिक द्वेषापोटी, प्रकरण सी.बी.आय्.कडे हस्तांतरित करावे !

वास्तूसजावटकार अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी मला अनधिकृत आणि सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकार नसतांनाही केवळ माझी छळवणूक करण्याच्या उद्देशाने या प्रकरणाच्या पुनर्अन्वेषणाचा आदेश दिला आहे.

अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांकडून आरोपपत्र प्रविष्ट

अन्वय नाईक आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग सत्र न्यायालयात ४ डिसेंबर या दिवशी आरोपपत्र प्रविष्ट केले आहे.