पंढरपूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – पंढरपूरकरांना ५ डिसेंबरपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन सकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आगाऊ’ नोंदणी न करता थेट घेता येणार आहे. पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना रहिवासी असल्याचा पुरावा दाखवणे आवश्यक आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी यांनी सांगितले. ज्या नागरिकांना सकाळी ६ ते ७ या वेळेत दर्शन घेता येणार नाही, त्यांना आगाऊ नोंदणी करून दर्शन घेता येणार आहे. आगाऊ नोंदणी केलेल्या भाविकांना सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत प्रत्येक घंट्याला २५० जण याप्रमाणे दर्शनास सोडण्याचे नियोजन केले असून प्रत्येक दिवशी ३ सहस्र भाविकांना मुखदर्शन दिले जाणार आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पंढरपूरकरांना आजपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री विठ्ठल दर्शन
पंढरपूरकरांना आजपासून सकाळी ६ ते ७ या वेळेत श्री विठ्ठल दर्शन
नूतन लेख
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी बाँब ठेवल्याचा दूरध्वनी !
अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते यांची सनद २ वर्षांसाठी रहित
कांदळी (जिल्हा पुणे) येथे संताच्या वंदनीय उपस्थितीत हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना !
#Exclusive : कराड (जिल्हा सातारा) बसस्थानकावर तंबाखूच्या पिचकार्यांनी रंगलेल्या अस्वच्छ भिंती !
गुढीपाडव्यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातील ५० टक्के पदे रिक्त !