ठाणे येथील उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणारे तिघेजण अटकेत

ठाणे, ४ डिसेंबर (वार्ता.) – वागळे इस्टेट येथील औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार काही जणांकडून चालू आहेत. अशाच एका उद्योजकाला खुनाची धमकी देत त्याच्याकडून ६ लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या त्र्यंबक पटेकर (वय २५ वर्षे), सोमनाथ दाभाडे (वय ३५ वर्षे) आणि शरद मोहतेकर (वय ४० वर्षे) या तिघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.