ठाणे येथील मंदिराची दानपेटी फोडणार्‍या दोघांना अटक

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

ठाणे – येथील मानपाडा भागात असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम चोरणार्‍या अजय जयस्वार (वय २२ वर्षे) आणि सलमान खान (वय २० वर्षे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली. त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. मानपाडा भागात वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्‍वभूमीवर कापूरबावडी पोलीस ३ डिसेंबर या दिवशी पहाटे २.५० वाजताच्या सुमारास गणेश रस्त्यावर गस्त चालू होती. त्या वेळी हे दोघेजण मंदिराच्या बाहेरून संशयास्पदरित्या जातांना आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांनी मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून दानपेटीतील रोख रक्कम चोरल्याचे मान्य केले.