खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांसह अन्य आरोपींना १९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला

मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांसह अन्य आरोपींना विशेष न्यायालयाने १९ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला आहे.

३ डिसेंबर या दिवशी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर्. सित्रे यांनी सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता; मात्र खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांसह अन्य ७ आरोपी अनुपस्थित होते. अन्य ४ आरोपी कोरोनामुळे न्यायालयासमोर उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती त्यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात दिली. कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी आणि अजय राहिरकर हे तिघे आरोपी न्यायालयात उपस्थित होते. या खटल्याला स्थगिती देण्यात आली नसल्याचे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले.