पाकचे पत्रकार कुअंर शाहिद यांनी दाखवला पाकच्या पंतप्रधानांना आरसा !

फ्रान्समधील मुसलमानांवर बोलणारे पाक नेते चीनमधील उघूर मुसलमानांवर मौन बाळगतात ! सोनाराने कान टोचले की, अधिक योग्य ठरते; मात्र पाकसारख्या कोडग्या देशावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हेही तितकेच खरे !

शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !

कणकवली शहरात मुंबई-गोवा महामार्गाची हद्द निश्‍चित न झाल्यास महामार्गाचे काम बंद पाडणार ! – रूपेश नार्वेकर, नगरसेवक

शहरातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे; मात्र महामार्गाच्या दोन्ही बाजूंना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या हद्दीचे ‘नीस’ (हद्द समजण्यासाठीचे दगड) लावलेले नाहीत. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अवैध बाधकामे होत असून शहर बकाल होऊ लागले आहे.

पदयात्रेच्या वेळी कायद्याचा भंग केल्याविषयी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ संघटनेच्या विरोधात आमदार फ्रान्सिस्को पाचेको यांची तक्रार

अशी तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला एखादी संघटना नियमबाह्य कृती करत असल्याचे का लक्षात येत नाही ?

सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांचा बहिष्कार : शासनाकडून बैठक रहित

गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनानिमित्त पुढील वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन करण्याविषयी ठेवलेली सर्वपक्षीय बैठक शासनाकडून रहित करण्यात आली आहे. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि मगोप यांनी या बैठकीवर बहिष्कार घालणार, असे आधी सांगितले होते.

छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंगाच्या स्फोटात २ जण घायाळ

नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक जीप उडवून लावल्याने २ नागरिक घायाळ झाले. बासागुडा आणि तर्रेम गावाच्या मध्य राजपेंटा गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी हा भूसुरूंग पेरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे २ मासांतच संभाजीनगर येथे स्थानांतर

दोन मासांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा पदभार स्वीकारलेले डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे तातडीने संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी स्थानांतर करण्यात आले आहे.

इस्लामी देशांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा नाहीच !

पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या  हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही,..