नेपाळमधील घरफोड्याला पुणे गुन्हे शाखेकडून अटक !

पुणे – घरफोडी केल्यानंतर दागिने विक्रीसाठी आलेल्या नेपाळमधील अनिल खडका याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्याने २२ नोव्हेंबर या दिवशी हडपसर येथील उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी केली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.