ट्रेलरची फूड कोर्टला भीषण धडक
रायगड – पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलरने फूड कोर्टला भीषण धडक दिली. यात हॉटेल कामगार इंद्रदेव पासवान याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिपीन यादव या ट्रेलरचालकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ट्रेलरने अन्य काही वाहनांना धडक दिली आहे. घटनेनंतर अनेक जण ‘फूड कोर्ट’मधून धावत बाहेर पडले.
मुंबईत पोर्शे कारची दुचाकींना धडक !
मुंबई – वांद्रे येथे भरधाव वेगातील पोर्शे कारने अनेक दुचाकींना धडक दिली. यात कुणीही घायाळ झाले नाही; पण काही दुचाकींचा चुराडा झाला. चालक ध्रुव नलिन गुप्ता (वय १९ वर्षे) हा मुंबईतील मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याने मद्यपान केले होते का ? याची चौकशी चालू आहे. वाहनात ४ तरुण आणि १ तरुणी होती.
कुंडलिका नदीत बुडून चौघांचा मृत्यू !
मुंबई – वांद्रे येथे भरधाव वेगातील पोर्शे कारने अनेक दुचाकींना धडक दिली. यात कुणीही घायाळ झाले नाही; पण काही दुचाकींचा चुराडा झाला. चालक ध्रुव नलिन गुप्ता (वय १९ वर्षे) हा मुंबईतील मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याने मद्यपान केले होते का ? याची चौकशी चालू आहे. वाहनात ४ तरुण आणि १ तरुणी होती.
खिशातील भ्रमणभाषचा स्फोट; मुख्याध्यापक मृत !
गोंदिया – येथे खिशात ठेवलेल्या भ्रमणभाषचा स्फोट होऊन मुख्याध्यापक सुरेश संग्रामे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नत्थु गायकवाड हेे गंभीर घायाळ झाले.
बनावट पारपत्राद्वारे सिंगापूरला गेलेल्या महिलेला अटक !
मुंबई – बनावट पारपत्र मिळवून सिंगापूरला गेलेल्या नेपाळी महिलेला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून तिने हे पारपत्र मिळवले होते. त्याद्वारे तिने यापूर्वी तीन वेळा विमान प्रवास केला. (बनावट पारपत्र समजले कसे नाही, हे गंभीर आहे ! – संपादक) या प्रकरणी सहार पोलिसांनी तिला अटक केली आहे. बिष्णूमती शमन तमंग असे तिचे नाव आहे.
संपादकीय भूमिका : एक महिला बनावट पारपत्राद्वारे ३ वेळा भारतातून सिंगापूरला जाते हे सुरक्षाव्यवस्थेला लज्जास्पद !
पुणे रेल्वेस्थानकावर बाँब ठेवल्याची धमकी !
पुणे – येथील रेल्वेस्थानकावर बाँब ठेवल्याची धमकी देणारा संपर्क पुणे पोलिसांना आला. पुणे पोलिसांनी संबंधित भागाची पडताळणी केल्यावर तेथे काही आढळले नाही. नंतर एका मद्यपीने खोडसाळपणाने हा संपर्क केल्याचे लक्षात आले, त्याला कह्यात घेण्यात आले आहे.