सिंधुदुर्ग किल्ल्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करा ! – माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट

सिंधुदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील जलदुर्गांची होत असलेली पडझड थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, अशी मागणी माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेने केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानसभेत काळे फलक दाखवल्याच्या प्रकरणी सभापतींची विरोधी सदस्यांना चेतावणी

लोकशाहीच्या नावाखाली विरोधक आदरसन्मानही विसरतात का ? राज्यपाल या पदाचा तरी आदर राखूया, असे भान विरोध करतांना का रहात नाही ?

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध ! – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आणि कटीबद्ध रहाणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्यावेळी ते बोलत होते.

कृषी मंडळ कार्यालयाला आज टाळे ठोकणार ! – बांदा सरपंचांची चेतावणी

तालुक्यातील येथील बांदा विभागीय कृषी मंडळ कार्यालयासमोर २६ जानेवारीला ध्वजारोहण करण्यात न आल्याने बांद्याचे सरपंच अक्रम खान यांनी कार्यालयात जाऊन कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांना याविषयी खडसावले

प्रजासत्ताकदिनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या ४ धर्मांध तरुणांना अटक

अशा देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !

२ वर्षांत राज्यातील २३ मराठी प्राथमिक शाळा बंद

राज्यात मागील २ वर्षांत २३ मराठी प्राथमिक शाळा बंद झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना दिली. विधानसभेत उपस्थित प्रश्‍नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ९ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करणार्‍या मिशनर्‍यांना कारागृहात डांबा !

सांताक्रूझ-ताळगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सांताक्रूझ आणि ताळगांव ग्रामस्थांची पाऊसकर यांच्या घरासमोर निदर्शने

अत्यंत खराब स्थितीत असलेला सांताक्रूझ ते ताळगाव रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी २६ जानेवारीला सांताक्रूझ आणि ताळगाव येथील ग्रामस्थांनी आल्तिनो, पणजी येथे निदर्शने केली.

सांगे येथेही आयआयटी प्रकल्प उभारण्यास विरोध

मेळावली, सत्तरीनंतर आता सांगे येथे आयआयटी प्रकल्पास विरोध होत आहे. सांगे येथे आयआयटी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अशासकीय संस्था आणि कार्यकर्ते यांची नुकतीच एक बैठक झाली.

३० जानेवारी या दिवशी देहलीत भाजपकडून तिरंगा मोर्चा

येथे प्रजासत्ताकदिनी शेतकर्‍यांनी केलेल्या हिंसाचारानंतर आणि लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा लावल्यानंतर भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ३० जानेवारी या दिवशी देहलीमध्ये तिरंगा फडकावणारा मोर्चा आयोजित केला आहे.