(म्हणे) ‘सरकार ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या विरोधात पोलीस बळाचा वापरत करत आहे !’ – मनोज परब, नेता, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’

मनोज परब म्हणाले, ‘‘आर्.जी.’ राजकारणात उतरत असल्याने याला अडथळा आणण्याचा हा प्रकार आहे.’’

‘आप’च्या जिल्हा परिषद सदस्याने बनावट ‘जात’ दाखला दिल्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने अपात्रता याचिका प्रविष्ट

‘आप’चे गोव्यातील एकमेव जिल्हा पंचायत सदस्य हेंजल फर्नांडिस यांनी बनावट ‘जात’ दाखला देऊन जिल्हा पंचातय निवडणूक लढवल्याची तक्रार काँग्रेसच्या नेत्या रॉयला फर्नांडिस यांनी एका याचिकेद्वारे केली आहे.

शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली ! – महालेखापालांचे ताशेरे

शासनाने ७ हॉटेलमालकांना आरामकरात (लक्झरी टॅक्स) नियमबाह्यरित्या १ कोटी ४५ लाख रुपये सूट दिली. ही माहिती ‘कम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’ (कॅग) यांच्या ‘ऑडिट’ अहवालात नमूद केली आहे. ‘कॅग’ने हा ‘ऑडिट’ अहवाल २९ जानेवारी या दिवशी विधानसभेत मांडला आहे.

राज्यात तिसर्‍या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी करणारा ठराव २३ विरुद्ध ८ मतांनी फेटाळण्यात आला

फोंड्याचे आमदार रवि नाईक यांनी सत्तरी, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यांचा मिळून राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा खासगी ठराव विधानसभेत मांडला होता. हा ठराव अखेर २३ विरुद्ध ८ मतांनी विधानसभेने फेटाळला.

खासदार आणि आमदार यांच्या नावाने दूरभाष करून फसवणुकीचा प्रयत्न करणार्‍या एकाला अटक

पहिल्याच गुन्ह्याच्या वेळी कठोर कारवाई झाली असती, तर पुढील गुन्हे करण्याचे गुन्हेगाराचे असे धाडस झाले नसते.

सरकारी भूमीवरील बांधकामे नियमित करण्यासाठी शासन यंत्रणा उभारणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोमुनिदाद आणि सरकारी भूमी यांवरील बांधकामे नियमित करण्यासाठी सरकार यंत्रणा निर्माण करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. हळदोणाचे आमदार ग्लेन टिकलो यांनी मांडलेल्या ठरावावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

सातारा येथे ऑक्टोबर मासात वृक्ष संमेलन

देवराई प्रकल्प आणि सातारा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे वृक्ष संमेलन ऑक्टोबर मासात सातारा येथे होणार आहे, अशी माहिती अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत ‘दळणवळण बंदी’ कायम रहाणार ! – शासनाचा निर्णय

राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य शासनाकडून झोनमधील ‘दळणवळण बंदी’ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मधमाशांचे पोळे बनवण्याच्या खोक्यांचे शेतकर्‍यांना वितरण

गोवा खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळाने उत्तर गोवा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेच्या सहयोगाने एका विशेष सोहळ्याद्वारे जुने गोवे येथील कृषी क्षेत्रात सांताक्रूझचे आमदार आंतोनियो फर्नांडिस यांच्या हस्ते मधमाशांचे पोळे बनवण्याच्या १०० खोक्यांचे वितरण केले.

‘बालभारती’ची स्वत:ची शैक्षणिक वाहिनी चालू होईल ! – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

यात बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न रहाणार आहे,