हरिद्वार कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची आरोग्य मंत्रालयाची चेतावणी !

कुंभ मेळा

नवी देहली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हरिद्वार येथील कुंभमेळ्याच्या काळात कोरोनाचा उद्रेक होण्याची चेतावणी दिली आहे. येथे प्रतिदिन १० ते १२ स्थानिक नागरिक आणि १० ते २० भाविक कोरोनाबाधित झाल्याचे आढळून येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने उत्तराखंड सरकारला ही चेतावणी दिली आहे. ‘कुंभमेळ्यातील पवित्र स्नानानंतर स्थानिकांमध्ये कोरोनाचे संक्रमण होऊन उद्रेक होऊ शकतो’, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी उत्तराखंडच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.