डेहराडून (उत्तराखंड) येथील हिंदु युवा वाहिनीने १५० मंदिरांबाहेर लावले अन्य धर्मियांना मंदिरात प्रवेशबंदी असल्याचे फलक !

पोलिसांकडून गुन्हा नोंद !

यात गुन्हा नोंद करण्यासारखे काय आहे ? हिंदूंच्या मंदिरांमध्ये हिंदूंनी कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही, हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांना आहे. मक्केमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नाही, तर मग हिंदूंच्या मंदिरांमध्ये अन्य धर्मियांना हिंदूंनी प्रवेश नाकारला, तर ते चुकीचे कसे ? ‘गोमांस भक्षण करणार्‍या धर्मांधांनी मंदिरात प्रवेश केल्यास मंदिराचे पावित्र्य भंगले जाईल’, असेच हिंदूंना वाटते ! उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना असा गुन्हा नोंदवणे हिंदूंना अपेक्षित नाही !

डेहराडून (उत्तराखंड) – येथील १५० हून अधिक मंदिरांबाहेर ‘हे तीर्थस्थान हिंदूंसाठी पवित्र स्थान आहे. येथे अहिंदूंना प्रवेश बंद आहे’, अशा आशयाचे फलक हिंदु युवा वाहिनीकडून लावण्यात आले आहेत. यानंतर ‘राज्यातील अन्य मंदिरांमध्येही असे फलक लावण्याचा मानस आहे’, असे या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. या फलकावर या संघटनेचे सरचिटणीस जितू रंधावा यांचे नाव असल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. नंतर पोलिसांनी कारवाई करत हे फलक काढण्यास प्रारंभ केला असून या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली आहे. (मशिदींवरील अवैध भोंगे काढण्यास कचरणारे, दंगलींमध्ये हिंदूंना वार्‍यावर सोडणारे, तसेच धर्मांधांकडून स्वतः मार खाणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

१. हिंदु युवा वाहिनीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद यांनी, ‘जर एखाद्या अहिंदूने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चोपले जाईल आणि पोलिसांच्या कह्यात दिले जाईल’, अशी चेतावणी दिली आहे. तसेच त्यांनी म्हटले की, मंदिरे ही सनातन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. येथे अन्य धर्मियांचे काय काम ? आम्ही जे करत आहोत ते धर्माच्या रक्षणासाठी करत आहोत.

२. काँग्रेसने या घटनेवर टीका करतांना म्हटले आहे की, हे एक सुनियोजित कृत्य आहे. गेल्या ४ वर्षांत भाजप सरकारकडून काही विशेष काम करण्यात आलेले नाही. ते लपवण्यासाठी कधी श्रीराम, कधी फाटकी जीन्स आदी विषय काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधले जात आहे. भाजपला निवडणुका आल्या की, श्रीराम, हिंदु-मुसलमान, भारत-पाकिस्तान अशी सूत्रे आठवू लागतात. (निवडणुका आल्या की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मंदिरांमध्ये जावेसे वाटते, हेही हिंदूंच्या लक्षात आहे ! – संपादक)