ब्रिस्बेनच्या लक्ष्मीनारायण मंदिरावर लिहिण्यात आल्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा !

हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून होणारी आक्रमणे, तसेच हिंदूंवर होणारी आक्रमणे रोखण्यात ऑस्ट्रेलियातील सरकारला येत असलेले अपयश लज्जास्पद आहे ! भारत सरकारने याविषयी जाब विचारणे आवश्यक आहे !

चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

भारतात अशी घटना घडली असती, तर पोलिसांनी आरोपीला ठार केले नसते ! ऑस्ट्रेलियात नागरिकांच्या जिवाची अधिक काळजी घेतली जाते, हेच यातून लक्षात येते ! धर्मांध कुठेही असले, तरी गुन्हेगारी वृत्तीनुसारच वागतात !

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासावर फडकवला खलिस्तानी झेंडा !

ब्रिस्बेन येथील भारताच्या वाणिज्यदूत अर्चना सिंह यांना २२ फेबु्रवारीला कार्यालयात खलिस्तानी झेंडा फडकवलेला दिसून आला. यानंतर त्यांनी त्वरित क्वींसलँड पोलिसांना याची माहिती दिली.

(म्हणे) ‘महाशिवरात्री साजरी करायची असेल, तर ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणावे लागेल !’ – खलिस्तान

जगभरातील खलिस्तानवादी प्रवृत्ती भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याने भारत सरकारने पंजाबमधील खलिस्तानवादी संघटना नष्ट करण्यासह जगभरात जिथे-जिथे खलिस्तानवादी आहेत, तिथे-तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तेथील सरकारांना खडसवायला हवे !

जॉर्ज सोरोस यांना वाटते की, जग त्यांच्या विचारांनुसार चालते ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रत्युत्तर

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या जॉर्ज सोरोस यांनी ‘भारतातील उद्योगपती अदानी यांच्यावर आरोपांच्या प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावे लागेल’, असे विधान केले होते.

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यास ऑस्ट्रेलिया सरकारला सांगा ! – भारतियांची जयशंकर यांच्याकडे मागणी

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील भारतियांनी ‘जयशंकर यांच्याकडे ही मागणी केली.

(म्हणे) ‘भजनास आमंत्रित गायक कट्टर हिंदु असल्याने हिंसा करू !’ – खलिस्तानवादी, ऑस्ट्रेलिया

मेलबर्न येथे गेल्या काही आठवड्यांत ऑस्ट्रेलियातील ३ हिंदु मंदिरांवरील आक्रमणांच्या घटना समोर आल्यानंतर आता येथील काली माता मंदिरातील महिला पुजार्‍याला धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे.

शिखांच्या शस्त्र बाळगण्यावर बंदी घाला !

खलिस्तानवाद्यांकडून भारतियांवर करण्यात आलेल्या आक्रमणाच्या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांना निवेदन देण्यात आले. येथील श्री दुर्गा मंदिराला गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांनी भेट दिल्यानंतर त्यांना हे निवेदन देण्यात आले.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून राष्ट्रध्वज हातात घेतलेल्या भारतियांवर आक्रमण

खलिस्तानवाद्यांची देश आणि विदेश  येथील वाढत चाललेली वळवळ ठेचून काढण्यासाठी भारत सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मागील इतिहासापासून बोध घेऊन मोठी हानी होण्यापूर्वी जलद कृती करण्याची आवश्यकता आहे !