शिखांच्या शस्त्र बाळगण्यावर बंदी घाला !

  • ऑस्ट्रेलियात भारतियांकडून गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांना निवेदन

  • निहंग शिखांना ऑस्ट्रेलियातून तात्काळ हाकलण्याची केली मागणी !

भारतियांकडून गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांना निवेदन

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथे २९ जानेवारी या दिवशी खलिस्तानवाद्यांकडून भारतियांवर करण्यात आलेल्या आक्रमणाच्या संदर्भात ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांना निवेदन देण्यात आले. येथील श्री दुर्गा मंदिराला गृहमंत्री क्लेअर ‘ओ’नील यांनी भेट दिल्यानंतर त्यांना हे निवेदन देण्यात आले. त्याद्वारे ७ मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यांनी या मागण्यांकडे गांभीर्याने पहाण्याचे आश्‍वासन दिले.

भारतियांकडून करण्यात आलेल्या मागण्या

१. शिखांना शस्त्रे देण्यास आणि त्यांचा वापर करण्यास बंदी घालावी.

२. तात्पुरत्या व्हिजावर आलेल्या निहंग शिखांना (निळे कपडे धारण केलेले शीख) ऑस्ट्रेलियातून बाहेर काढावे.

३. धार्मिक स्थळ आणि चारचाकी वाहने यांवर लावण्यात आलेले आक्षेपार्ह भित्तीपत्रके हटवण्यात यावीत.

४. २९ जानेवारी २०२३ या दिवशी झालेल्या आक्रमणातील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा.

५. मेलबर्न येथे २९ जानेवारी या दिवशी खलिस्तान्यांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. सरकारने त्यातील पीडितांना संरक्षण पुरवावे.

६. शिखांची धार्मिक स्थळे कट्टरतावाद्यांपासून मुक्त करण्यात यावीत.

७. या सर्व प्रकरणात नियमितपणे आढावा देण्यात यावा.