चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

(प्रतिकात्मक चित्र)

सिडनी – ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ फेबु्रवारीला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महंमद हा मूळचा भारतातील तमिळनाडू येथील रहिवासी आहे.

 (सौजन्य : India Today) 

महंमद याने सिडनी रेल्वे स्थानकावर एका कर्मचार्‍यावर चाकूद्वारे आक्रमण केल्याचा, तसेच त्यानंतर दोघा पोलीस कर्मचार्‍यांनाही चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप ऑस्ट्रेलिया पोलिसांकडून करण्यात आला. प्रथम पोलिसांनी त्याला समाजवण्याचा प्रयत्न केला. तथापि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्यावर ३ गोळ्या झाडल्या. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

संपादकीय भूमिका

  • भारतात अशी घटना घडली असती, तर पोलिसांनी आरोपीला ठार केले नसते ! ऑस्ट्रेलियात आरोपीऐवजी नागरिकांच्या जिवाची अधिक काळजी घेतली जाते, हेच यातून लक्षात येते !
  • धर्मांध कुठेही असले, तरी गुन्हेगारी वृत्तीनुसारच वागतात, असेच या घटनेवरून कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !