ऑस्ट्रेलियातील गुरुद्वाराच्या बाहेर खलिस्तानच्या मागणीसाठी सार्वमत घेण्याविषयी भित्तीपत्रके चिकटवली !

खलिस्तानी आतंकवाद कॅनडा, अमेरिका आदी देशांत फोफाववला असतांना भारत सरकारने तो नष्ट करण्यासाठी काहीही पावले न उचलल्यामुळे तो आज जगात फोफावत आहे.

न्यूझीलंडमध्ये १ जानेवारी २००९ नंतर जन्मलेल्यांना सिगारेट खरेदीवर बंदी

हा कायदा जरी करण्यात आला, तरी जे या दिनांकापूर्वी जन्मलेले आहेत, ते सिगारेट खरेदी करून या दिनांकानंतर जन्मलेल्यांना देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून हिंदु ब्राह्मणांनी शिखांना जाळल्याचा दुष्प्रचार !

जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांच्या कारवाया रोखण्यासाठी परदेशी नागरिकांच्या व्हिसाची तपासणी होणार !

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून भारतविरोधी कारवाया चालू आहेत. आता यांवर कठोर कारवाई करण्याची सिद्धता ऑस्ट्रेलियाच्या सरकारने केली आहे.

श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूला बलात्काराच्या आरोपावरून ऑस्ट्रेलियात अटक  

बलात्काराच्या प्रकरणी श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू धनुष्का गुणतिलका याला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ येथे आला होता.

सिडनी (ऑस्‍ट्रेलिया) येथे भारतीय विद्यार्थ्‍यावर वर्णद्वेषातून चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण

भारतियांवर अमेरिका, युरोप, ऑस्‍ट्रेलिया आदी देशांत होणार्‍या आक्रमणांच्‍या प्रकरणांकडे भारत सरकारने गांभीर्याने पाहून त्‍यांच्‍या रक्षणासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत !

आशिया आणि अमेरिका खंड भविष्यात एकत्र येऊन होणार अमेशिया महाद्वीप !

पुढील २० ते ३० कोटी वर्षांमध्ये आर्क्टिक महासागर आणि कॅरिबियन सागर हे विलुप्त होऊन आशिया अन् अमेरिका खंड एकत्र येतील. यामुळे ‘अमेशिया’ नावाचे महाद्वीप उदयास येईल, असा अंदाज ऑस्ट्रेलियातील ‘कर्टिन विश्वविद्यालय’ आणि चीनचे ‘पेकिंग विश्वविद्यालय’ येथील संशोधनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

पाश्‍चिमात्य देशांनी अनेक दशके भारताला शस्त्रपुरवठा केला नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री वेनी वोंग यांच्यासमवेत १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

न्यूझीलंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या ‘व्हिसा’चे सहानुभूतीपूर्ण निराकरण करावे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

कोरोना काळानंतर न्यूझीलंडमध्ये परतू न शकणार्‍या  भारतीय विद्यार्थ्यांच्या ‘व्हिसा’च्या सूत्राचे सहानुभूतीपूर्ण निराकरण करावे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.

ऑस्ट्रेलियन लोक हे जगात सर्वाधिक श्रीमंत लोक !

जगात ऑस्ट्रेलियन लोक हे सर्वाधिक श्रीमंत झाले असून त्यांच्याकडे सरासरी २ लाख ७४ सहस्र डॉलर्स (२ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक) एवढी मालमत्ता आहे.