कोरोनाची उत्पत्ती कुठून झाली, हे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनच्या वुहानमध्ये पोचले !

एक वर्षांनंतर वुहानमध्ये जाऊन या पथकाला काय सापडणार आहे ? चीनने यापूर्वीच कोरोनाविषयीच्या संक्रमणाचे सर्व पुरावे नष्ट केले असणार, हे लहान मुलही सांगील !

उत्तरप्रदेशातील विद्यार्थ्यांना आता ‘गंगा नदी संवर्धन’ विषय शिकवला जाणार !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर असा विषय शिकवण्याचे सुचणे, हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल ! केवळ गंगानदीच नव्हे, तर देशातील प्रत्येक नदीचे संवर्धन कसे करावे ?, हे लहानपणापासून शिकवणे आवश्यक !

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने माघार घेत अटी लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला !

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने ४ जानेवारीला त्याच्या नव्या सेवा अटी (टर्म ऑफ सर्व्हिस) घोषित करत त्याची कार्यवाही ८ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे घोषित केले होतेे. या सेवा अटी न स्वीकारणार्‍याचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ डिलीट होणार आहे, असे यात म्हटले होते.

नागपूर येथे कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा ठेवल्याने साहित्यिक यशवंत मनोहर यांंनी ‘जीवनव्रती पुरस्कार’ नाकारला !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अहंकार ! डॉ. मनोहर यांची हिंदूंच्या देवतांविषयी कमालीची असलेली द्वेषीवृत्ती साहित्य संघाला ठाऊक नव्हती का ? अशांना पुरस्कार घोषित करतांनाच त्याविषयी विचार होणे अपेक्षित होते !

आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये ! – सैन्यदलप्रमुख नरवणे यांची चीनला चेतावणी

भारतीय सैन्याच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटी यांमधून प्रश्‍न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत; पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये !

जनभावनांचा आदर करून मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला एका गटाचा विरोध होता आणि हा गट इतरांची दिशाभूल करत होता. आयआयटी प्रकल्पाचे लाभ सांगूनही लोकांना ते पटले नसल्याने शासनाला आता तेथील प्रकल्प रहित करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे धर्मांधाकडून भीम आर्मीच्या नेत्याची हत्या

गावकर्‍यांनी जाळले धर्मांधाचे घर !
बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने !
‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे या घटनेविषयी काही बोलतील का ?

‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरील वेब सिरीज ‘तांडव’मधून भगवान शिवाचा अवमान !

बहुसंख्येने हिंदू रहात असलेल्या देशात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशा वेब सिरीज देशात चालू असणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! काही धर्मप्रेमी वगळता इतर हिंदू हे मृतवत आहेत. त्यामुळेच हिंदु धर्मावर अशा प्रकारे आघात होतात !

आजपासून देशभरात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अनुमाने ३ लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस दिली जाईल. रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत, यासाठी जानेवारीत एकूण १० दिवसच लसीकरण होईल.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ‘रायटर’ महिलेला ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

असे लाचखोर कर्मचारी पोलीस खात्यात असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी न्यून होईल का ? भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !