असे लाचखोर कर्मचारी पोलीस खात्यात असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी न्यून होईल का ?
पुणे – तक्रारदाराच्या भावाविरुद्ध नोंद असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकर पाठवण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ जानेवारी या दिवशी महिला हवालदाराला रंगेहात पकडले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातच ही कारवाई झाली. श्रद्धा शरद अकोलकर असे त्यांचे नाव आहे. अकोलकर या सध्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे यांच्या ‘रायटर’ म्हणून कार्यरत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. (भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल ! – संपादक )