मुझफ्फरपूर (बिहार) येथे धर्मांधाकडून भीम आर्मीच्या नेत्याची हत्या

गावकर्‍यांनी जाळले धर्मांधाचे घर !

  • बिहार पुन्हा जंगलराजच्या दिशेने !
  • ‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे या घटनेविषयी काही बोलतील का ?
भीम आर्मीचे माजी जिल्हाध्यक्ष रंजीत पासवान (चित्र सौजन्य : नवभारत टाईम्स)

मुझफ्फरपूर (बिहार) – येथे भीम आर्मीचे माजी जिल्हाध्यक्ष रंजीत पासवान उपाख्य जॉन यांची येथील कपरी गावात शाहबाज अन्सारी उपाख्य रिंकू नावाच्या तरुणाने हत्या केली. यामागे त्याच्या भावाशी असलेला वाद असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी शाहबाज याला अटक केली आहे.

या हत्येनंतर रंजीत यांच्या समर्थकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन केले. त्यांनी रंजीत यांच्या नातेवाईकाला सरकारी नोकरी, हानीभरपाई म्हणून दीड कोटी रुपये आणि हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा करण्याच्या मागण्या केल्या. या वेळी पोलीस आणि प्रशासन यांनी त्यांना आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. दुसरीकडे गावकर्‍यांनी शाहबाज यांच्या घराबाहेरही आंदोलन केले; मात्र त्यापूर्वीच त्याचे नातेवाईक घर सोडून पळून गेले होते. त्यामुळे गावकर्‍यांनी शाहबाजच्या घराला आग लावली. यामुळे येथे नंतर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.