स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर असा विषय शिकवण्याचे सुचणे, हेही नसे थोडके, असेच म्हणावे लागेल ! केवळ गंगानदीच नव्हे, तर देशातील प्रत्येक नदीचे संवर्धन कसे करावे ?, हे लहानपणापासून शिकवणे आवश्यक !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाने ‘गंगा नदी संवर्धन’ हा विषय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या ‘नमामी गंगे’ विभागाच्या पुढाकाराने हे पाऊल उचलण्यात आले आहे. असा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे उत्तरप्रदेश हे पहिलेच राज्य आहे.
गंगा संवर्धन आणि जलप्रदूषण रोखण्याविषयीचा अभ्यासक्रम शिक्षणमंडळाने बनवला आहे. या विषयामध्ये विद्यार्थी हिमालयापासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा गंगेचा प्रवास जाणून घेतील, तसेच नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या विविध मार्गांविषयीचा अभ्यास करतील.