मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे; मात्र अनेक तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान !

राज्यातील ३४ जिल्ह्यांत १४ सहस्र २३४ निवडणुकींसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान पार पडले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत किरकोळ अपप्रकार वगळता चुरशीने मतदान झाले.

संभाजीनगर येथे बनावट मतदान करण्यासाठी आलेले तिघे जण पोलिसांच्या कह्यात

मयत भास्कर जयाजी ढोले (वय ६२ वर्षे) यांच्या नावाने त्यांच्याच वयाची एक व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी आली होती. त्यांच्याकडे बनावट मतदान ओळखपत्र होते. त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

असोदा (जिल्हा जळगाव) येथील मतदान केंद्रावर पोलिसांचा उमेदवारांवर सौम्य लाठीमार

जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झाले. असोदा येथे पोलिसांनी उमेदवारांवर सौम्य लाठीमार केला.

सोयीसुविधांच्या अभावी खैरी (जिल्हा वर्धा) येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

ग्रामस्थांना इतकी वर्षे सोयीसुविधा का मिळाल्या नाहीत ? याचा शासन-प्रशासन यांनी विचार करावा !

राज्याचे मंत्री कायद्यापेक्षा मोठे नाहीत ! – अनिल देशमुख

भाजपकडून धनंजय मुंडे यांना लक्ष करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात येत आहे, तसेच सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी १४ जानेवारी या दिवशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष निजाम सय्यद यांच्याकडून हिंदु धर्मविरोधी लिखाणाविषयी जाहीर क्षमायाचना !

अल्ला किंवा मशीद यांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सय्यद यांनी प्रसारित केले असते का ?

२५ जानेवारीपासून गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन

२५ ते २९ जानेवारी या कालावधीत गोवा विधानसभेचे ४ दिवसीय अधिवेशन होणार आहे. २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन असल्याने या दिवशी विधानसभेचे कामकाज होणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६६ ग्रामपंचायतींसाठी ७० टक्के मतदान : मतदान शांततेत !

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला झालेले मतदान शांततेत पार पडले. मतदानानंतर १ सहस्र ८७ गावकारभार्‍यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून १८ जानेवारीला होणार्‍या मतमोजणीकडेे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !

मकरसंक्रतीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे पू. अधिवक्ता हरिशंकर जैन, अधिवक्ता आर्. वेंकटरमणी आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.