विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान ! – दादा वेदक, विश्‍व हिंदु परिषद

देशातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर निधी समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे.

सीमालढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवूया ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे.

खेड येथील होळकरांच्या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा – विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर

या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा, तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे

दैनिक तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार

दैनिक तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना ‘ग्रुप ऑफ मीडिया कोल्हापूर’ यांच्या वतीने पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील बजाज फायनान्स आस्थापनाला रिझर्व्ह बँकेकडून अडीच कोटी रुपयांचा दंड

नॉन बँकिंग वित्तीय सेवा देणार्‍या बजाज फायनान्स आस्थापनाला NBFC प्रॅक्टिस कोडच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अडीच कोटी रुपये दंड आकारला आहे.

गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे गोवंशियांची अवैधपणे कत्तल करून ३ सहस्र ५०० किलो मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध टेम्पोचालक सुफियान अन्सारी आणि अश्फाक मोहम्मद यांना कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

नगर येथील आरोग्य विभागातील औषधाच्या साठ्याभोवती कचर्‍याचा ढीग

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषधे ठेवण्यास जागा नसल्याने या इमारतींच्या जवळील बॅडमिंटन हॉलचा वापर काही वर्षांपासून औषधे ठेवण्यासाठी केला जातो; मात्र सध्या या औषध साठ्याला सर्व बाजूंनी कचर्‍याच्या ढिगाने वेढले आहे.

दत्त जयंतीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड येथे विविध उपक्रमांचे आयोजन

दत्त जयंतीनिमित्त १० डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत पिंपरी, चिंचवड आणि नाशिक रस्ता विभागात प्रबोधन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेमध्ये दैनिक सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी, हितचिंतक, नातेवाईक आणि जिज्ञासू असे एकूण १३६ जण सहभागी झाले होते.

१५ वर्षांनंतर प्रथमच शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीत सदस्यांची निवड बिनविरोध

बाहेरचे राजकारणी दिशाभूल करत असल्याने आम्ही युवक भरकटलो होतो. गडाख यांच्यामुळे नवीन विश्‍वस्त सर्वसमावेशक निवडले आणि ग्रामपंचायतही बिनविरोध झाली, असे नूतन सदस्य बाळासाहेब कुर्‍हाट यांनी सांगितले.

गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध तडीपार

गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा धर्मांध लाल अहमद महिबूब कुरेशी याची विविध स्तरांवर चौकशी होऊन पोलीस उपायुक्त (परिमंडळ) सोलापूर यांनी त्यास सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका येथून एक वर्षासाठी तडीपार आदेश जारी केला आहे.